लातूर जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीसाठी जिल्हा कॉंग्रेसचे निरिक्षक व समन्वयक जाहीर

लातूर जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीसाठी जिल्हा कॉंग्रेसचे निरिक्षक व समन्वयक जाहीर

जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांची माहिती

लातूर (प्रतिनिधी) : राज्यातील नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजत असुन त्या दृष्टीने लातूर जिह्यातील देवनी, जळकोट, चाकुर, शिरुर अनंतपाळ या नगर पंचायत च्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी कॉंग्रेसने निवडणुकीत यश मिळवण्यासाठी तयारी म्हणून चाकुर, देवनी, शिरुरअनंतपाळ, जळकोट या चारही नगर पंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने कंबर कसली असुन चारही तालुक्यात 4 निरीक्षक व 4 समन्वयक यांच्या नियुक्त्या कॉंग्रेस पक्षाने केल्या आहेत अशी माहिती जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी दिली आहे.

तालुका निहाय निरिक्षक व समन्वयक खालील प्रमाणे आहेत

  1. जळकोट – पृथ्विराज सिरसाठ (निरिक्षक), अँड प्रमोद जाधव (समन्वयक)
  2. चाकुर – अभय साळुंके (निरिक्षक), प्रा.ओमप्रकाश झुरळे (समन्वयक)
  3. देवनी – मोईज शेख (निरीक्षक), विकास देशमाने (समन्वयक)
  4. शिरुरअनंतपाळ – दगडूसाहेब पडिले (निरिक्षक), प्रवीण पाटील (समन्वयक) यांच्या नियुक्त्या कॉंग्रेस पक्षाने केल्या असुन नगर पंचायत निवडणुका पार पडेपर्यंत हे सर्व निरीक्षक व समन्वयक त्या ठिकानी थांबुन प्रचार यंत्रणा व कॉंग्रेस पक्षाकडे अहवाल देतील असेही कळवण्यात आले आहे.

या निवडी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या आदेशानुसार राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी घोषित करण्यात आल्या आहेत. नगर पंचायत निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्ष तयारी करित असुन त्यासाठी लवकरच त्या त्या तालुक्यात कॉंग्रेस पक्षाची बैठक घेवुन कामाला लागण्याच्या सुचना कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते याना दिल्या आहेत अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यानी दिली आहे.

About The Author