चंदरअण्णा प्रतिष्ठान म्हणजे गोरगरीबांचा आधारवड : राज्यमंत्री संजय बनसोडे

चंदरअण्णा प्रतिष्ठान म्हणजे गोरगरीबांचा आधारवड : राज्यमंत्री संजय बनसोडे

उदगीर (अॅड.एल.पी.उगीले) : उदगीर परिसरातील जनतेसाठी चंदरअण्णा प्रतिष्ठान म्हणजे आधारवड बनला आहे. गोरगरीबांच्या सुखदु:खात सहभागी होवून त्यांना आधार देतांनाच लघुउद्योग करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी नाममात्र व्याजदरावर कर्ज पुरवढा करून स्वावलंबी बनवले आहे. गरजुंना मदत करण्यात ज्यांना आनंद होतो, त्या चंदरअण्णाचा वसा या प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकर्त्यांनी उचलला आहे. या अर्थाने चंदरअण्णा प्रतिष्ठान म्हणजे गोरगरीबांसाठी आधारवडच आहे. असे विचार राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या 500 कुटुंबांना यावर्षीही चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यमंत्री संजयजी बनसोडे यांच्या हस्ते अन्नधान्य किट वाटप करण्याच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून  बस्वराज पाटील नागराळकर, शिवाजीराव मुळे सभापती पं. स. उदगीर, कल्याणजी पाटील, लाईफ केअरच्या सर्वेसर्वा डाॅ. अर्चनाताई पाटील चाकुरकर, लोकनेते चंद्रशेखर भोसले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रितीताई भोसले, सहयोग बॅंकेचे मॅनेजर सुनित देशपांडे, रुद्रालीताई पाटील, आदितीताई पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलतांना बनसोडे यांनी चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या कार्याचे  कौतुक व अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन शिवशंकर पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले. सदरील कार्यक्रमास उद्योजक विमलताई गर्जे, रामेश्वर बिरादार, पत्रकार अशोक कांबळे, केदार पाटील, हरिश्चंद्र वट्टमवार,रमेश खंडोमलके, राजकुमार बिरादार बामणीकर, सचिन वाघमारे, कल्याण बिरादार , ज्ञानोबा मुंढे, राजेंद्र स्वामी, विशाल हाळीकर, जय सोनवणे, विजय सुवर्णकार, चेतन परसेने आदी मित्रपरिवार व गरजू लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रम शासनाच्या सुचना, नियमानुसार सोशल डिस्टन्स पाळून घेण्यात आले.

About The Author