दिलासादायक; दिवसभरात 1643 रुग्ण कोरोनामुक्त
नवीन 1303 कोरोनाबाधित रुग्ण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 52451 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1303 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 836 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 355 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 2610 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 817 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67839 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 14202 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1186 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 52451 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1643 आहे.