कोरोना काळात फ्रंट वाॅरियर्स च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे – बाळासाहेब पाटोदे

कोरोना काळात फ्रंट वाॅरियर्स च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे - बाळासाहेब पाटोदे

उदगीर (प्रतिनिधी) : सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असून हा दुसरा टप्पा खडतर असल्याचे आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचे आणि समाजाचे कोरोना पासून संरक्षण व्हावे, म्हणून जे कोरोना योद्धे आपल्या जीवाचे रान करून काम करत आहेत. त्यांचे आरोग्य जपण्याचे काम होणे गरजेचे आहे. असे विचार भाजपचे युवा नेते तथा सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी व्यक्त केले. सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने उदगीर शहरातील शासकीय कार्यालये आणि डॉक्टर, समाज सेवी संस्था यांना सॅनिटायझर, मास्क चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

 पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने सतत सामाजिक जाणिवा जपण्याचे काम हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून माजी आमदार भाजपचे नेते सुधाकर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली एक सामाजिक उपक्रम म्हणून सॅनिटायझर आणि मास्क वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. असेही पाटोदे यांनी सांगितले. याप्रसंगी उदगीर नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुधीर भाऊ भोसले, नगरसेवक दत्ता पाटील, नियोजन सभापती सावन पस्तापुरे, मंडलाधिकारी गणेश हिवरे, तलाठी अमोल रामशेट्टे, मयूर वट्टमवार, संदीप सोनवणे सामाजिक कार्यकर्ते कपिल धनशेट्टे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने तहसीलदार रामेश्वर गोरे, अमृत हॉस्पिटलचे डॉक्टर अनुप चिकमुर्गे, डॉक्टर सुप्रिया चिकमुर्गे, नगर परिषद कार्यालयामध्ये महेश कवठे, नाईक मॅडम, उपमुख्य अधिकारी गोलंदाज, नगर रचनाकार सुष्मिता गाडे, शिवानी मॅडम, पाणीपुरवठा अभियंता कटके इत्यादी मान्यवरांना सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांच्या हस्ते सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप करण्यात आले.

About The Author