गातेगाव पोलीस स्टेशनची कोरोनामुक्त गावाकडे वाटचाल
लातूर ( प्रतिनिधी ) : कोरोनाला गावात पाय ठेऊ न देण्यासाठी गातेगाव पोलीस स्टेशन यांनी सुरू केलेला उपक्रम गातेगाव परिसरातील लोकांना खूपच भावला आहे. हा उपक्रम पाहून उपक्रमाचे कौतुक केले जात आहे . घरातल्या घरात काळजी करणारा आणि काळजी वाहणारा हा उपक्रम फार महत्वाचा आहे, अशा शब्दात गातेगाव परिसरातील लोक तोंडभरून स्तुती करत आहेत.
यामुळे संकटाच्या काळात गातेगाव पोलीस स्टेशन मार्फत यांच्या एका चांगल्या लातूर पॅटर्नची चर्चा घडून येत असल्याने प्रशासनाचे बळ वाढले आहे. प्रत्येक गावातील आशा वर्कर्स, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यांची संयुक्त मिटींग घेऊन आपआपले गाव कोरोनामुक्त कसे होईल यावर चर्चा करून प्रत्येक गावातील वार्ड नुसार वार्ड निहाय ग्रामपंचायत सदस्य , आशावर्कर यांची नियुक्ती करून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी घरातील व्यक्तींना शक्यतो घराबाहेर जाऊ न देणे, जाणे गरजेचेच असेल तर त्यांनी तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधला आहे का? याची खातरजमा करून त्यांना मास्क व रूमाल बांधण्यास प्रवृत्त करणे , एखादा रुग्ण आढळल्यास त्याच्या परिवारातील लोकांची कोविड चाचणी करून त्यांना योग्य ते सहकार्य करणे,होमआयसोलेशन असलेल्या लोकांवर लक्ष ठेवणे, त्यांना कोविड सेंटर, हाॅस्पीटल ला जाण्यासाठी वाहन उपलब्ध करून देणे, विनामास्क कोणीही गावात फिरणार नाही या कडे लक्ष देणे, तसेच गावात एकत्र मिळून बसू न देणे , कार्यक्रम आयोजित करण्यास प्रतिबंध करणे असे अनेक कामे प्रत्येक गावातील , ग्रामपंचायत सदस्य, आशावर्कर यांनी गावात लक्ष केंद्रीत करून आपले गाव कसे कोरोनामुक्त होईल हे पाहणे गरजेचे आहे.
गावातील सरपंच यांनी याबाबत नियंत्रण ठेवून आपले गाव कसे कोरोनामुक्त होईल या कडे लक्ष केंद्रीत करावे,असा उपक्रम गातेगाव पोलीस स्टेशन चे अधिकारी विलास नवले यांनी प्रत्येक गावात ग्रामपंचायत सदस्य, आशावर्कर यांची बैठक घेऊन परिसरात ही संकल्पना ठेवत आहेत, काही गावातील सरपंचानी आपल्या गावात हा उपक्रम ही राबवायला सुरुवात केली आहे,लवकरच गातेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावे ही संकल्पना राबवून आपले गाव कोरोनामुक्त करतील अशी अपेक्षा गातेगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी व्यक्त केली आहे.