शिवाजी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन

शिवाजी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील शिवाजी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता करण्यात आलेले आहे. या मेळाव्याचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळ हे राहणार आहेत.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गंगाधरराव दापकेकर ,सचिव नंदिग्राम कृषी व ग्रामविकास संस्था, सुगाव व प्रमुख उपस्थिती ज्ञानदेव झोडगे सचिव किसान शिक्षण प्रसारक मंडळ, एम डी जाधव अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना शिवाजी महाविद्यालय उदगीर, डब्ल्यू एन जाधव सचिव माजी विद्यार्थी संघटना शिवाजी महाविद्यालय, उदगीर यांची राहणार आहे. महाविद्यालयातून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी खासदार, आमदार ,सभापती , शासकीय सेवेत उच्च पदावर तसेच सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीत कला, वाणिज्य, विज्ञान, बीसीए पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच आपल्या जडणघडणीत व शैक्षणिक क्षेत्रात महाविद्यालयाने आपल्यासाठी केलेल्या कार्याबद्दलची भूमिका आपण व्यक्त करावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए एम नवले,उपप्राचार्य डॉ. एस व्ही जगताप, उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे तसेच माजी विद्यार्थी संघटना व माजी विद्यार्थी समिती संयोजन समितीने केले आहे.

About The Author

error: Content is protected !!