आंदोलनाच्या ठिकाणी जावून मारहाण,शिवीगाळ व धमकी – गुन्हा दाखल

आंदोलनाच्या ठिकाणी जावून मारहाण,शिवीगाळ व धमकी - गुन्हा दाखल

उदगीर ( प्रतिनिधी ) : उदगीर शहरातील खानका गल्लीमधील शेख लाईक शेख अकबर यांनी बेकायदेशीर व विनापरवाना बांधकाम करून त्या जागेत बेकायदेशीरपणे बेकरी चा कारखाना सुरु केल्या संदर्भात व हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे म्हणून अब्दुल मुक्तदीर अब्दुल मुनाफ देवणीकर यांनी नगरपालिका प्रशासनासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.सदरील आंदोलन मोडित काढण्यासाठी शेख लाईक शेख अकबर यांनी आंदोलन कर्ते देवणीकर यांना आंदोलनाच्या ठिकाणी जावून मारहाण केली,शिवीगाळ केली आणि धमकी दिली अशी फिर्याद देवणीकर यांनी उदगीर शहर पोलिस स्टेशनला दिली आहे.या फिर्यादीवरून शहर पोलिस स्टेशन येथे लाईक शेख यांच्या विरोधात सी आर पी सी 155 अंतर्गत एन सी क्र 151/21,गुन्हा कलम323,504,506,34 भारतीय दंड विधान संहिता अन्वये दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात देवणीकर यानी सदरील अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात उदगीरच्या उपमुख्यधिकाऱ्यांना विनंती केली असता, त्यांनी देवणीकर यांच्याकडे बक्षिसाची अर्थात लाचेची मागणी केल्याची तक्रारही सदरील निवेदनात देवणीकर यांनी केली आहे. तसेच या जागेवरील बेकायदेशीर बांधकाम तात्काळ काढून टाकण्यात यावे. ज्यामुळे या कारखान्यातून वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण होत असून परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. यामुळे नागरिकांच्या, वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुले त्यांच्या आरोग्यावर भीषण दुष्परिणाम होत असल्याचेही सदरील निवेदनात नमूद केले आहे. तसेच या कारखान्याच्या प्रदूषणामुळे आजूबाजूला असलेल्या जुन्या घरांना तडे जात असून ध्वनी प्रदूषणामुळे कानावर व र्‍हदयावर विपरीत परिणाम होत असल्याचे ही नमूद केले आहे. तसेच या कारखान्यातून जे दूषित पाणी बाहेर सोडले जाते ते समोरच्या खड्ड्यात साचत असल्यामुळे रोगराई पसरण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. असेही सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नागरिकांची सनद (सुधारित) 2004 शासन निर्णयाप्रमाणे पृष्ट क्रमांक 28 परिशिष्ट 64 तसेच नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम 2016 अन्वये नगर परिषद यांनी कारवाई करणे अनिवार्य आहे. असे असतांना देखील संबंधितावर कारवाई न करता नगरपालिकेचे कर्मचारी या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही सदरील निवेदनात करण्यात आला आहे. तसेच अन्न व भेसळ कार्यालयास पत्र काढून उपमुख्य अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचाही आरोप सदरील निवेदनामध्ये करण्यात आला आहे.

अन्न व भेसळ विभागाने झटकले हात

या प्रकरणी अन्न व भेसळ विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा पदावधित अधिकारी शि.वा.कोडगीरे यांनी तक्रारदार देवणीकर यांना या प्रकरणाचा अर्थात अर्जात नमुद मुद्य् क्र.एक ते चोविस हे या कार्यालयाशी संबंधीत नाही.तसेच  उदगीर सिठी कार्यरत अन्न व भेसळ सुरक्षा अधिकारी हे कोरोना  संदर्भातील कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.तेथुन कार्यमुक्त झाल्यानंतर योग्य निर्णय घेतील असे कळवले आहे.वरिष्ठ पातळीवरून असे पत्र आल्याने  देवणीकर हतबल झाले असले तरी आंदोलन चालूच ठेवले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!