रेमडीसिवीर शिवाय कोरोणा बाधित रुग्णावर यशस्वी उपचार..!

रेमडीसिवीर शिवाय कोरोणा बाधित रुग्णावर यशस्वी उपचार..!

ना रेमडीसीवीर,ना महागडी औषधे तरीही रुग्ण होताहेत ठणठणीत बरे

अहमदपूर ( गोविंद काळे) : अहमदपूर येथील कदम हॉस्पिटल व कोव्हीड सेंटरच्यावतीने कोरणाबाधित रुग्णावर रेमडीसीवीरशिवाय ८५ वर्षीय अनुसया सुकरे व ७० वर्षीय सविता वाघमारे यांच्यावर स्कोर अनुक्रमे १३ व १४ उपचार करण्यात आला. सुखरूपपणे ते आपल्या घरी गेले. रेमडीसीवीरशिवाय असे एकूण २८ रुग्ण ठणठणीत बरे झाले एकही रुग्ण दगावला नाही.

याविषयी सविस्तर वृत असे की, कमीत कमी औषधांचा वापर करून ऑक्सिजन कमी पडत असल्यास ऑक्सिजन थेरपीचा वापर करतो .कधी कधी सुरुवातीला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक्स वापरतो हे पण सहज उपलब्ध आहे याशिवाय स्वस्त देखील आहेत. सुरुवातीला स्टेरॉइड्स दिल्यानंतर आम्ही ब्रांको डायलेटचा वापर करतो. अँटिव्हायरस औषधे सर्रास उपलब्ध आहेत त्यांचाही वापर करतो. यानंतरचे उपचार रुग्णांमध्ये दिसणाऱ्या लक्षणावर अवलंबून असतात कोणाला डोकेदुखी तर कोणाला जुलाब रुग्णाच्या लक्षणानुसार मग प्रत्येकाला उपचार दिले जातात अशा शब्दात डॉ. पी. एस. कदम यांनी रेमेडीसीवीरशिवाय रुग्णांना कोरोनामुक्त कसं करता येईल याबद्दल सविस्तर माहिती दिली.

कोरोना रुग्णांचा तालुक्यात दिवसेंदिवस आकडा वाढत आहे. रुग्ण अत्यवस्थ होत आहेत . सध्या रेमडीसी वरची प्रचंड चर्चा आहे. मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे काळाबाजार होऊ लागला आहे. रेमडीसीवीरशिवाय उपचार शक्य नसल्याचं म्हणत काही रुग्णालय रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडीसीवीर आणण्यास सांगत आहेत तर काही ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक रेमडीसीवीर देण्याचा डॉक्टरांकडे आग्रह करत आहेत या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने डॉक्टरांशी संवाद साधला व रेमडीसीवीरशिवायही को रोणा रुग्णांना बरं करता येते याबद्दल उपचार पद्धती जाणून घेतली कदम हॉस्पिटल व कोव्हीड सेंटर , अहमदपूर येथे डॉ.पी. एस. कदम व त्यांच्यासोबत ची आयसीयूमध्ये काम करनारी त्यांची टीम डॉ. वैभव रेड्डी, डॉ. बालाजी साळुंखे , डॉ.आनंद शहापूरकर, डॉ.संग्राम नरवटे यांच्यामुळे रुग्णांना कोरणामुक्त करण्यात यश येत आहे. कदम हॉस्पिटल यांचा कर्मचारी वर्ग धनंजय भोसले, सूर्यकांत घोरपडे, संगम शिवपुजे, गुरुनाथ कदम, धोंडीराम हांडे ,दत्तात्रय पेड, क्रांती आडे ,लॅबटेक्निशियन मदन डोरे , गोरख नवले, फार्मासिस्ट धनंजय कोटलवार रुग्णांना बरे करण्यात स्टाफ कर्मचाऱ्यांचे सुद्धा मोठे योगदान आहे.

चौकट : आय. सी. एम.आरच्या गाईडलाइन्सनुसार गंभीर अवस्था असलेल्या पाच टक्के रुग्णांसाठी रेम डीसीवीर वापरण्यात यावा पण एम्स च्या नव्या गाईडलाईन नुसार रेमडी सीवीर वापरण्याची सक्ती नाही. कोरोनाचा परिणाम फुफसावर होतो व फुफसावर सूज येते व ऑक्सिजन कमी पडते या दोन गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्टेरॉइड्समुळे फुफसाची सूज कमी करता येते.
-डॉ.पी. एस. कदम
कदम हॉस्पिटल,अहमदपूर.

About The Author