आक्षेपार्ह पोस्ट कराल तर तुरुंगात जाल, सोशल मीडियावर लातूर पोलिसांची बारीक नजर

लातूर (एल.पी.उगीले) : याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मागील काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमांतून धार्मिक आणि जातीय भावना दुखावून दोन समाजांत तेढ निर्माण होतील असं स्टेटस, व्हिडिओ क्लिप्स,आक्षेपार्ह मजकूर, एसएमएस तयार करून प्रसारित करणाऱ्या विरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. यासाठी पोलिसांनी ‘लातूर सोशल मीडिया वॉचर्स’ ही व्यवस्था अधिक प्रभावीपणे चालू केली आहे.

आक्षेपार्ह पोस्ट कराल तर तुरुंगात जाल, सोशल मीडियावर लातूर पोलिसांची बारीक नजर

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळण्याचं आवाहन केलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमांतून पसरवण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची सर्वप्रथम खात्री करणं अत्यावश्यक आहे. पोलीस सर्व परिस्थितीला हाताळण्यास सक्षम असून, सायबर पोलीस टीम तंत्रज्ञान आणि लातूर सोशल मीडिया वाचर्स टीमच्या साहाय्याने सर्व सोशल मीडिया साइटवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

या सोशल मिडिया पेट्रोलिंगमुळे सातत्याने थेट आणि धडक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या कारवाई नुसार मागील चार दिवसाच्या कालावधीत लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला 04 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणांमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची हयगय न करता, त्यांच्याविरुद्ध सक्त कारवाई करण्यात येत आहे. सामाजिक शांतता खराब करून अशांतता होईल, असं वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरोधात विविध कलम व कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या काही अल्पवयीन मुलांना सुद्धा पालकासह पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांनी केलेली पोस्ट डिलीट करण्यात आलेली असून त्यांना समज देण्यात आलेली आहे.

About The Author

error: Content is protected !!