दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1420
नवीन 1027 कोरोनाबाधित रुग्ण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 61272 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1027 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 37 रुग्णांचा मृत्यु झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 1696 आरटीपीसीआर चाचणी साठी घेण्यात आलेले अहवाल प्रलंबित आहेत. कालच्या प्रलंबित 1511 मधील 510 पॉझिटिव्ह आले आहेत. 2097 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 517 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 74458 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11821 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1365 रुग्णांचा मृत्यु झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 61272 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1420 आहे.