औसा तालुक्यात अवकाळी पाऊस, पोमादेवी जवळगा येथे वीज कोसळून गाय ठार

औसा तालुक्यात अवकाळी पाऊस, पोमादेवी जवळगा येथे वीज कोसळून गाय ठार

औसा (प्रशांत नेटके) : तालुक्यात शनिवारी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वीजांचा कडकडाट व वादळी वार्‍यात तालुक्यातील जवळगा (पो.) येथे वीज कोसळून एका शेतकर्‍याची दुभती गाय जागीच ठार झाली.

औसा तालुक्यातील नागरसोगा, जवळगा, किल्लारी, गुबाळ या भागात पावसाने हजेरी लावली. वादळी वारा, मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या कडब्याच्या गंजीचे, कोथिंबीर, भाजीपाला व फुलशेतीचे मोठे नुकसान केले. द्राक्ष, आंब्यांच्या बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्‍यांनी नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील जवळगा (पो.) येथील संजय राम लांडगे यांनी त्यांच्या शेतातील झाडाला बांधलेल्या दुभत्या गायीच्या अंगावर शनिवारी दुपारी 3.15 वाजता वीज कोसळून गाय जागीच ठार झाली. संजय लांडगे यांनी 70 हजाराची गाय खरेदी केली होती. सकाळी व सायंकाळी मिळून 15 लिटर दूध देणारी गायच ठार झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

About The Author