समाजातील अडचणी सोडवण्यासाठी अभिजीत अशोकराव औटे मित्रमंडळाचे कार्य – अभिजीत औटे
लातुर (प्रतिनिधी) :- समाजातील सर्व स्तरातील अडचणी सोडवण्यासाठी अभिजीत औटे मित्रमंडळाच्या मध्यमातून सर्व समाज घटकाला सोबत घेऊन कार्य करणार आहे, असे प्रतिपादन अभिजीत अशोकराव औटे मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत औटे यांनी व्यक्त केले. ते लातूर येथे आयोजित पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात बोलत होते. ग्राहक जनजागृतीपर अभियान या विषयावरील मार्गदर्शन केले.यावेळी मित्र मंडळ महिला महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी शिला शरद घोटाळ यांची तर मराठवाडा अध्यक्षपदी सौ .संतोषी देवानंद मोरे तसेच लातुर जिल्हाध्यक्षपदी सौ संगीता महादेव बरूरे यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मित्र मंडळाच्या माध्यमातून जनसामान्याच्या अडचणी सोडवण्यासाठी व मित्र मंडळाच्या विस्तारासाठी काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष अभिजीत औटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उदगीर शहराध्यक्ष सलीम सय्यद याच्या संह अनेकांची उपस्थीती होती.