एन.एम .एम. एस.शिष्यवृत्ती परीक्षेत नागेशवाडीच्या बापू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उज्वल यश

एन.एम .एम. एस.शिष्यवृत्ती परीक्षेत नागेशवाडीच्या बापू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उज्वल यश

चाकूर (प्रतिनिधी) : डिसेंबर 2022 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत बापू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,नागेशवाडीच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले आहे. यात 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यापैकी 6 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी अंकिता इंद्राळे, रोहिणी केंद्रे ,ज्ञानेश्वरी केंद्रे, अक्षरा गायकवाड,नागेश कोकरे, किशोर भंगे हे आहेत. या बाजी मारलेल्या 6 विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा विद्यालयात पार पडला. याप्रसंगी संस्था सचिव देविदास नादरगे म्हणाले की, या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षी तालुका व जिल्हा पातळीवर विविध स्पर्धेत या शाळेचे विद्यार्थी भाग घेऊन मोठ्या प्रमाणात यश संपादन करीत असतात.त्या मुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडत आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, शिक्षकांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळे या शाळेतून दरवर्षी चार ते पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी 12000 रूपये प्रमाणे सलग पाच वर्ष ही शिष्यवृत्ती मिळते.

या प्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथराव मुडपे गुरुजी, प्राचार्य महादेव मद्ये , काशीबाई केसाळे सरपंच, नागेशवाडी, वैजनाथ जिवलगे सरपंच ,रोहीना, शाळेतील शिक्षक सूर्यकांत गव्हाणे, सूर्यकांत मुंडे ,संदीप कासले, धर्मेंद्र बोडके, प्रा. बालाजी नलाबले, प्रा.ज्ञानेश्वर चामे ,प्रा. गायकवाड, प्रा. हेळगे, प्रा. पाटील, बबीता देवर्षे, अनिता तेलंगे तसेच फफागिरे, इंद्राळे व चामलेवाड इत्यादींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

About The Author