कोटा मेंटार अकॅडमी उदगीरचे चार विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स साठी पात्र
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरात कार्यरत असलेल्या कोटा मेंटार अकॅडमीने आपले वर्चस्व दाखवून देत, उदगीर शहराच्या शैक्षणिक परंपरेमध्ये साजेसा मानाचा तुरा रोवला आहे. उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल घडवून राजस्थान किंवा देशाच्या इतर कोणत्याही राज्यांमध्ये जाऊन स्पर्धात्मक परीक्षांचे तयारी किंवा उच्च शिक्षणासाठी पात्रता धारण करण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणाच्या सुविधा कोटा मेंटार अकॅडमीने उदगीर शहरात उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे उदगीर पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालकांची सोय झाली आहे.
भारत सरकार तर्फे घेण्यात आलेल्या आय आय टी प्रवेशास लागणाऱ्या जेईई मेन्स -2023 परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन व जेईई ॲडव्हान्स -2023 साठी पात्र झालेले कोटा मेंटार अकॅडमीचे गुणवंत विद्यार्थी विराज देवणे , अदित्य तेलंगे , कु संस्कृती गंडारे, रोहीत देवशेटवार यांनी घवघवीत यश संपादन केले. यावेळी कोटा मेंटार अकॅडमी उदगीरचे मुख्य प्रवर्तक महेश मनोहरराव येरनाळे तसेच संचालिका सौ वंदना महेश येरनाळे व अकॅडमीचे कोटा येथील तज्ञ अनुभवी शिक्षकवृंद आनंद त्रिपाठी ,मानस मिश्रा,अमरेश शर्मा,आरती मिश्रा तसेच अकॅडमीचे सर्व कर्मचारी यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात आले.