अहमदपूर बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व
विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांचा गुलाल उधळून जल्लोष भाजप युतीकडे ५ जागा
अहमदपूर ( गोविंद काळे ) : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १३ जागा मिळवित आपले वर्चस्व निर्माण केले आहे. निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत, फटाक्याची आतिषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला अहमदपूर कृषि उत्पन्न बाजार समितीवर आमदार बाबासाहेब पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे.
सोसायटी मतदारसंघ – मंचकराव मोहनराव पाटील ५०६, किशन ईश्वरराव पाटील, ४४४, बालाजी पुडंलिक कातकडे ४३६, रामदास गोंविद कदम, ४६७, सतीश प्रताप नवट्टके, ४६४, संतोष प्रभूप्पा रोडगे, ४२१, संजय तुकाराम पवार ४४७
सोसायटी माहिला मतदार संघ- कैवल्या संतोष नागमोडे, ५०५, इंदूताई माधव पवार ४६६, सोसायटीओबीसी- चंद्रकांत पंढरीनाथ मद्दे ४५३, सोसायटी भटक्या विमुक्त जाती- यशवंत दत्तू केंदे, ५०२, ग्रामपंचायत सर्वसाधरण गट- शिवाजी सुभाषराव पाटील, ४०२ ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गट- शिवाजी नरसिंग खांडेकर ४२० हे सर्व महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार आहेत. भाजप, काँग्रेस ( एक गट ) शिवसेना शिदे गटाचे एकूण पाच उमेदवार विजयी झाले आहेत यात ग्रामपंचायत सर्वसाधरणगट- जिवनकुमार रामराव
मद्देवाड, ४१६, ग्रामपंचायत अनुसूचित गट – अण्णासाहेब रामकिशन कांबळे, ४२६, व्यापारी मतदारसंघ – धनराज भगवाराव पाटील, १४८, विलास दयासागर शेटे १६९, हमाल / तोलारी मतदारसंघ – मुस्तफा इब्राहिम सय्यद १०५ हे विजयी झाले आहेत. कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सोसायटी एकूण मतदान ८९० मतदान असून त्यापैकी ८८१ मतदान झाले. ग्रामपंचायत मतदारसंघात मतदान ८५८ मतदार असून ८४८ मतदान झाले. व्यापारी मतदारसंघात एकूण २६३ मतदानापैकी २५४ मतदान झाले आहे.