विद्यावर्धिनी नॅशनल स्कुलची श्रिया पौळ राज्यस्तरीय मंथन पुरस्काराने सन्मानित
अहमदपूर ( गोविंद काळे) : येथील विद्यावर्धिनी नॅशनल स्कुलची विध्यार्थीनी श्रिया शिवाजीराव पौळ हिने मंथन स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यस्तरावर चौथा क्रमांक प्राप्त केल्यामुळे तिचा नुकताच अहमदनगर येथे शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर व सिने अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्थे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला.
अहमदनगर येथील मंथन वेलफेअर फौंडेशन यांनी ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व भविष्यातील स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा दरवर्षी राज्यस्तरावर आयोजन करण्यात येते यावर्षी घेण्यात आलेल्या या परीक्षेत शाळेची विध्यार्थीनी श्रिया शिवाजीराव पौळ हिने राज्यस्तरावर चौथा स्टेट रँक प्राप्त करून पुरस्कारास पात्र ठरली त्याचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच अहमदनगर येथे पार पडला यावेळी पुरस्कार प्रदान करताना शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर श्री आशिष येरेकर, सिने अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना श्रिया पौळ समवेत शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा पाटील मॅडम व तिची आई सौ. पौळ मॅडम तरी तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे तसेच या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील सर, मुख्याध्यापिका तथा संस्था सचिव सुषमा पाटील नॅशनल चे समन्वयक अर्जुन केंद्रे, मार्गदर्शक कविता कौलबुद्धे, प्रियंका पवार, स्वाती जवणे, पूजा सूर्यवंशी, गजानन सोमवंशी यांनी तिचे अभिनंदन केले.