माजी मंत्री भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील यांच्यासह तिघांवर 353 चा गुन्हा दाखल

माजी मंत्री भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील यांच्यासह तिघांवर 353 चा गुन्हा दाखल

अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सुरू असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांना केली होती धक्काबुक्की. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या तक्रारीनंतर अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता होती. काही वर्ष प्रशासक यावर होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने 18 पैकी 13 जागेवर विजय मिळवला आहे. यामुळे भाजपाच्या हातून सत्ता गेली आहे. दि ३० एप्रिल रोजी रात्री मतमोजणी सुरू असताना माजी आमदार विनायकराव पाटील आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी मत मोजणी केंद्रावर जात गोंधळ घातला. निवडणूक निर्णय अधिकारी वसंत घुले यांना धक्काबुक्की केली होती त्याच दिवशी मध्यरात्री नंतर अहमदपूर पोलिसात या बाबत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली .अहमदपूर पोलिसांनी विनायकराव पाटील यांच्यासह इतर तिघां विरोधात कलम 353,332,171 एफ,114 आणि 34 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील चारही लोकांना अद्याप पोलिसांनी अटक केली नाही पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल दुरपडे हे करीत आहेत

About The Author