हातभट्टी दारू तयार करणाऱ्यां ठिकाणावर छापा,1 लाख 84 हजाराचा मुद्देमाल नष्ट

हातभट्टी दारू तयार करणाऱ्यां ठिकाणावर छापा,1 लाख 84 हजाराचा मुद्देमाल नष्ट

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात अवैध पद्धतीने ग्रामीण भागात तसेच शहरी भागातील तळीरामांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हातभट्टी चालवणाऱ्या अड्ड्यावर धाडी टाकून, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एक लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि रसायन नष्ट केले आहे.

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रेनापुर तालुक्यातील वसंतनगर तांडा,महापूर येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या इसमावर छापामारी केली. यामध्ये 3,040 लिटर रसायन ,साहित्य, हातभट्टीची दारू असा एकूण किंमत 1 लाख 84 हजार रुपयेचे रसायन,हातभट्टीदारू आणि हातभट्टी निर्मितीचे साहित्य नष्ट करण्यात आले आहे. या कार्यवाहीत सुखदेव खंडू राठोड (रा. वसंत नगर तांडा, महापूर ता. जि. लातूर),गणेश राम राठोड (रा. वसंत नगर तांडा महापूर ता. जि. लातूर.) व एक महिला अशा एकूण 03 आरोपीवर पो.ठाणे रेनापुर येथे कलम 65(ड)(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे एकूण 3 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथक मधील सहाय्यक फौजदार अंगद कोतवाड, पोलीस अमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हसबे, तुराब पठाण, जमीर शेख , राजू मस्के , नकुल पाटील यांनी केली आहे.

About The Author

error: Content is protected !!