भारताच्या नविन संसद भवनाला डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची श्रमिक क्रांतीची मागणी
देवणी (प्रतिनिधी) : दिल्ली येथे नविन संसद इमारत उभारण्यात आली आहे, त्या संसदेभवनास भारतिय संविधानाचे शिल्पकार,परमपूज्य,महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. अशा आशयाच्या मागणीचे निवेदन श्रमिक क्रांती आभियान महाराष्ट्र,या बिगर राजकिय संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. बाबासाहेबांनी भारतातल्या प्रत्येक नागरिकास अमुल्य आधिकार दिले आहेत. भारतातल्या सर्व नागरिकावर त्यांचे फार मोठे उपकार आहेत, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. हे निवेदन तहसिलदार देवणी यांचे मार्फत राष्ट्रपती,भारत सरकार नवी दिल्ली यांना देण्यात आलेआहे.तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या राज्यात हैद्राबाद येथे डा.बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे पंचविस फुटाचा पुतळा उभारुन तिथं नविन संसंद भवनाचे निर्माण ही केले आहे,त्या उभारलेल्या नवीन संसद भवनाला महामानव डा.बाबांसाहेब आंबेडकरांचे नाव देऊन देशापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.याबाबद या राज्याच्या मंत्रीमंडाळाचे जाहिर आभार व्यक्त केले.
भारताच्या नवीन संसदेला महामानव डां.बाबासाहेब आंबेडकरांजे नाव देऊन देशाला जगात सन्मान मिळवुन द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.या निवेदनावर संघटनेचे प्रमुख मारुती गुंडीले यांचे सह देवणी तालुकाध्यक्ष कोंडल कांबळे, लक्ष्मण रणदिवे, ज्योती कांबळे,पुजा रणदिवे, कांबळे रेणुका, बालाजी कांबळे,इत्यांदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.