महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ खलील शेख उत्कृष्ट कामगार पुरस्काराने सन्मानित

महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ खलील शेख उत्कृष्ट कामगार पुरस्काराने सन्मानित

देवणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील गुरनाळ गावचे रहिवासी असलेल्या खलील शेख हे महावितरण कार्यालयात आहेत, देवणी येथील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ खलील इस्माईल शेख यांना विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विद्दत वितरण कंपनी लातूरच्या वतीने उत्कृष्ट कामगार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा, कर्तव्ये बजावतांना यांनी सतत कार्यतत्परता दाखवली,खलील शेख यांच्या, दिलेल्या कामानुसार कर्तव्य दक्षता, निष्ठा व समर्पितवृत्ती या गुणांचा गौरव करून कामगार दिनी सन २०२२-२३ करिता “उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी” म्हणून लातूर परिमंडळचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाला बद्दल कार्यालयातील कर्मचारी, वरिष्ठ तंत्रज्ञ, पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!