आटोळा येथील मोफत रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आटोळा येथील मोफत रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील आटोळा ता. चाकूर येथे अखंड शिवनाम सप्ताह निमित्त कै. विमलबाई कल्लाप्पा तोडकरी यांच्या स्मरणार्थ अस्मिता एजन्सीज द्वारा भव्य मोफत रोगनिदान शिबिर संपन्न झाले.या शिबिराचे उद्घाटन डॉ. संजयजी शिवपूजे (हृदय रोगतज्ज्ञ) यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ वडगावे एच. व्ही. (जिल्हा आरोग्य अधिकारी,लातूर) ,राजेश्वर निटुरे (माजी नगराध्यक्ष उदगीर),चंदरआण्णा वैजापुरे (लिंगायत समाजाचे अध्यक्ष उदगीर) उपस्थित होते. तसेच नामदेव कदम,साईनाथ चिमेगावे, श्रीकांत पाटील,रामभाऊ मोतीपवळे,महेश तोडकर, प्रविण बिडवे, आनंद हूरदळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराचे प्रस्ताविक अंतेश्वर तोडकरी यांनी केले.शिबिरात डॉ पद्मसिंह बिराजदार, डॉ.सुवर्णा बिराजदार, डॉ संतोष बिराजदार, डॉ दयानंद निजवंते, डॉ अतुल उरगुंडे,डॉ प्रदिप नागुरे, डॉ श्रीकांत घोडके, डॉ दिग्विजय शिंदे,डॉ रोहन पाटील, डॉ अनुजा फड, डॉ आण्णासाहेब बिराजदार, डॉ भाग्यश्री कोरे, डॉ राहूल पाटील, डॉ श्रीकांत फड, डॉ प्रदिप खोकले यांनी उपस्थित १६०० रुग्णांची तपासणी केली.रुग्णाना तपासणी नंतर आवश्यक औषधे अंतेश्वर तोडकरी यांच्या तर्फे देण्यात आली.यावेळी डॉक्टरांसोबत त्यांचा स्टाफ व आटोळा उपकेंद्राच्या सी. एच. ओ. एन.क.फळे , डॉ देवानंद शेटे, डॉ माधव लोहारे ,सुपरवायजर बालिका कुरूपखेळे, वनिता बावगे ,कविता रावळे ,रेखा गंगापुरे यांनी मदत केली. शिबिराला आटोळा व आटोळा परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबिराचे आयोजन अंतेश्वर तोडकरी यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विरभद्र बावगे व नंदकुमार पटणे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!