पतंजलि योग समिति तर्फे राष्ट्रीय कौशल्य योगा ट्रेनर परीक्षा संपन्न

पतंजलि योग समिति तर्फे राष्ट्रीय कौशल्य योगा ट्रेनर परीक्षा संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : भारत सरकारद्वारा (कौशल्य विकास मंत्रालय) आयोजित राष्ट्रीय कौशल्य योगा ट्रेनर पात्रता परीक्षेचे पतंजलि योग समिति उदगीर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. परीक्षेत उदगीर, अहमदपूर, देवणी पतंजलि योग प्रशिक्षकांनी सहभाग घेऊन आपले प्रशिक्षण पूर्ण करून योगा ट्रेनर परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.

आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे सदरीलचे आयोजन करण्यात आले होते. योगा मास्टर प्रा. ओमप्रकाश मानधना हे प्रशिक्षण व मार्गदर्शन साठी उपस्थित होते,पतंजलि योग समिती उदगीरचे उत्तीर्ण प्रशिक्षक उमाकांत रामचंद्र अंबेसंगे, सुरेंद्र माधवराव अक्कनगिरे, विरभद्र गुरबसप्पा कप्पीकेरे, सौ. मिनाक्षी विवेकानंद स्वामी, सौ. सुमती गंगाधर भातांब्रे, गोविंद रामराव कोटगिरे, बळवंत दामोदर कुलकर्णी,ग्यानोबा काशिनाथ बेदाडे, संगमेश रेवणसिद्धय्या स्वामी हे आहेत.

About The Author