कोरो इंडिया व श्रमीक क्रांती आभियानाच्या वतीने घोणसी गावात बैठक संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : जळकोट तालुक्यातल्या घोणसी गावात कोरो इंडिया ग्रासरुटस नेतृत्व विकास कार्यक्रमाआतर्गंत श्रमीक क्रांती आभियानाच्या वतीने महिलांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत एकल महिला व बेघर लोकांची स्थीती जाणुन घेण्यात आली. एकल महिलांनी, शासनाकडुन संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मिळणारे आनुदान तुटपुंजे आसुन त्या आनुदानात वाढ व्हावी, असा विचार उपस्थीत निराधार महिलांनी मांडला.तर कोरोनाच्या काळात संघटनेच्या वतीने दोनशे आकरा बेघर लोकांचा गावठाण विस्तारासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे, मात्र कोरोनामुळे त्याचा पाठपुरावा करता आला नाही. याबाबद पाठपुरावा करुन या योजनेची आमल बजावणी करुन घेण्यात यावी, असा ठराव या बैठकीत घेण्यात आला.तसेच काही घरकुल लाभार्थीयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आसुन या दुर्लक्षित लाभार्थ्याना लाभ मिळवुन देणे कामी पाठपुरावा करण्याचे ही ठरले. उत्पन्नाची २१ हजाराची आट रद्द करणे बाबद ही चर्चा करण्यात आली.काही लोकांना घरकुल मंजुर झाले पण जागा उपलब्ध नाही, हे ही निराधारांचे प्रश्न समोर आले. हे सर्व प्रश्न सोडवुणुकीस प्रशासनाकडुन हयगय होत असल्यास या संबधी संघटनेच्या वतीने कायदेशीर कार्यवाही चालविण्यासाठी प्रशासन व्यवस्थेवर कायदेशीर दबाव तंत्राचा वापर करण्याची तयारी ठेवावी, असे ही या बैठकीत ठरले.या बैठकीस संघटनेचे प्रमुख मारुती गुंडीले सह संघठनेच्या जळकोट ता. महिला आघाडी प्रमुख आनिता गायकवाड,संघटनेचे कार्यक्रते लक्ष्मण जाणतिने महिला कार्यकर्त्या चौतराताई नवाडे,शोभा बिरादार सह आनेक महिला या बैठकिस उपस्थीत होत्या.