कमालवाडी येथे जनसुरक्षा सप्ताहाचे गणेश हाके यांच्या हस्ते उद्घाटन

कमालवाडी येथे जनसुरक्षा सप्ताहाचे गणेश हाके यांच्या हस्ते उद्घाटन

देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील कमालवाडी येथे बौद्ध पोर्णीमाचे औचित्य साधुन जनसुरक्षा सप्ताह व घरगुती अर्थसंकल्प व बँक सेवा सुविधेविषयी जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने बँकेतील सेवा कशा पद्धतीने लोकांना पोहोचल्या पाहिजेत, भारतीय रिझर्व बँक व क्रिसील फाउंडेशन आणि मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटर देवणी यांच्या संयुक्त विद्यमानाने कमलवाडी येथे आज लोकांमध्ये आणि बँकेची नाते कसे जोडले पाहिजे, या माध्यमातून लोकांपर्यंत जनधन खाते ,प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, अटल पेन्शन ,घरगुती अर्थसंकल्प, आर्थिक नियोजन,बचत व गुंतवणूक, सुकन्या समृद्धी योजना ,लोन, डिजिटल व्यवहार, सिव्हिल स्कोर बँक विषयी सविस्तर माहिती दिली. या गावात नागरिकांना मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटरचे मॅनेजर हुसेन धोत्रे यांनी प्रभात फेरीत लोकांना शासकीय योजनेची माहिती व बँकेविषयी माहिती सांगितली. शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे. असे अनेक बँकिंग विषयी सखोल असे मार्गदर्शन करून बँकेचे नाते जोडले पाहिजे असे सांगितले. व यासोबत मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटरच्या क्षेत्र समन्वयक जयश्री सोनकांबळे व जळकोटचे क्षेत्र समन्वयक लक्ष्मीकांत मोरे यांनी पण या रॅलीला संबोधित केले. या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात सरपंच गणेश हाके यांच्या हस्ते प्रभात फेरीची उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली.

About The Author