बुद्ध पोर्णिमेनिमित्त शिक्षक, महिला व शिष्यवृत्ती पात्र विध्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

बुद्ध पोर्णिमेनिमित्त शिक्षक, महिला व शिष्यवृत्ती पात्र विध्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

देवणी (प्रतिनिधी) : बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधुन समतेची शिकवण देणारे संत गुरु रविदास महाराज समाज मंदिर देवणी येथे कर्तव्यनिष्ठ शिक्षक, विविध क्षेत्रातील यशस्वी महिला व पुर्व प्राथमिक शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. यावेळी आखिल भारतीय रविदासिया धर्म संघटनेचे राज्य प्रवक्ते मोतीराम कांबळे वडगावकर यांनी गुरु रविदास महाराज यांच्या वाणीवर प्रवचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ. मधुश्री घाटगे पाटील यांनी भुषविले. प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती कर्तव्यनिष्ठ शिक्षक नागेश जीवणे उपस्थित होते. यावेळी कर्तव्यनिष्ठ शिक्षक चंद्रकांत मोठेराव, सरोजना सुर्यवंशी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नरहरी शास्त्री देवणीकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक इस्माईल शेख, सेवानिवृत्त शिक्षिका व नगरसेवक मेहरुनिसा शेख, सहशिक्षिका संगीता टिळे, रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, सहशिक्षक बालाजी टिळे, सहशिक्षक कामदेव टिळे, दयानंद कांबळे तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र गुणवंत विद्यार्थी रोहित लोहकरे, शुभम गायकवाड आदींचा गुणगौरव करुन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात यशस्वी महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवाजी सोनटक्के यांनी केले. तर आभार प्रदर्शन बालाजी टिळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमर टिळे, लक्ष्मण गायकवाड, सुभाष टिळे, कमलबाई टिळे, भाग्यश्री गायकवाड, उषाराणी टिळे, चंदा टिळे, दयानंद कांबळे, धोंडीबा गायकवाड, नागनाथ गायकवाड, कामदेव टिळे, अंकुश टिळे, विजय गायकवाड, संजय गायकवाड इत्यादींनी परिश्रम घेतले.

About The Author