किसनराव बिरादार यांची शिक्षक समितीच्या राज्य संपर्क प्रमुख पदी निवड

किसनराव बिरादार यांची शिक्षक समितीच्या राज्य संपर्क प्रमुख पदी निवड

देवणी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत किसनराव बिरादार यांची राज्य संपर्क प्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली.किसनराव बिरादार हे विद्यार्थी प्रिय शिक्षक असून सध्या देवणी तालुक्यातील प्रा.शा.कोनाळी येथे प्रा.पदवीधर म्हणून कार्यरत असून सद्यस्थितीत कें.प्रा.शा.विळेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.अत्यंत अभ्यासू,संयमी,व चळवळीतील कार्यकर्ते असून शिक्षकांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी प्रसंगी निवेदने,आंदोलने करुन न्याय मिळवून देणारे संघटनेचे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.किसनराव बिरादार यांनी आतापर्यंत शिक्षक समितीच्या तालुका स्तरावरील विविध पदावर कार्य केले आहे. मागील 9 वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वी कार्य केले. यासंबंधी राज्य स्तरावर दखल घेवून शिक्षक समितीच्या राज्य संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करुन राज्यस्तरांपर्यंतचे प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली आहे.या संघटनेचे राजन कोरगावकर राज्य सरचिटणीस,विजय कोंबे यांच्या आदेशा प्रमाणे नियुक्ती पत्र देण्यात आले. त्या बद्दल जिल्हाध्यक्ष अरुण साळुंके, सरचिटणीस चंद्रकांत भोजने, तालुकाध्यक्ष शिवाजीराव टिळे, अभय बिरादार, प्रकाश मरतुळे, माधवराव फावडे, भरत पुंड, गोविंद बारसंगे यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष व लातूर जिल्ह्यातील शिक्षक व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!