शास्त्री प्राथमिक शाळेत राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता

शास्त्री प्राथमिक शाळेत राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधव केंद्रे व प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख, ज्येष्ठ शिक्षक सुधाकर पोलावार,सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते शाहू महाराज व अरविंदजी घोष यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

प्रमुख मार्गदर्शक माधव केंद्रे यांनी महाराष्ट्राला समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभलेला आहे.शाहू महाराजांनी अनेक कायदे व धोरणे राबवून सामाजिक सुधारणा केल्या.सिंचनासाठी काम केले.प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.शिक्षणासाठी अनेक संस्था,वस्तीगृहे सुरू केली व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली.अश्याप्रकारे शाहू महाराजांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी ‘प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत’हे धोरण महाराष्ट्र शासनाने शाहू महाराजांकडूनच घेतले आहे.शिक्षणासाठी त्यांनी अनेक प्रेरणादायी कार्य केलेले आहे.तुम्ही मुलांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शिका,उच्च शिक्षण घेऊन आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करा. असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्याम गौंडगावे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

About The Author