सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी सोपवली – बसवराज रोडगे

सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी सोपवली - बसवराज रोडगे

उदगीर (एल. पी. उगिले) : मी एक सामान्य कार्यकर्ता असून देखील, लातूर जिल्ह्याचे नेते तथा खासदार सुधाकरराव शृंगारे यांनी माझ्या नावाची शिफारस करून दक्षिण मध्य रेल्वेच्या सल्लागारपदी निवड केली आहे. माझ्यातील कार्यकर्ता विचारात घेऊन, मी सर्वसामान्य जनतेचे काम करू शकेन, असा विश्वास त्यांना वाटला. त्यांनी माझ्या कार्याची दखल घेतली. याबद्दल मी सर्व पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त करतो, आणि त्यांनी सोपवलेली जबाबदारी इमानीतबारे पार पडतो. असे विचार भारतीय जनता पक्षाचे उदगीर तालुका अध्यक्ष तथा दक्षिण मध्य रेल्वेच्या सल्लागारपदी नव्यानेच नियुक्त झालेले बसवराज रोडगे यांनी व्यक्त केले.

एका सच्चा आणि सर्वसामान्य नागरिकाबद्दल तळमळ असलेल्या कार्यकर्त्याला काम करता येईल, अशा ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे सदस्य रमेशआप्पा कराड, माजी आ. सुधाकरराव भालेराव, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके, वसंत शिरसे, मीनाक्षीताई पाटील, उत्तराताई कलबुर्गे, पांढरेताई इत्यादी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन सत्कार केल्याबद्दल ही बसवराज रोडगे यांनी ऋण व्यक्त केले, तसेच पक्षश्रेष्ठींनी आणि नेत्यांनी जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास सार्थ करून दाखवेन. असे अभिवचनही या सत्काराला उत्तर देताना रोडगे यांनी दिले.

बसवराज रोडगे यांच्या या निवडीबद्दल उदगीर तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या अभिनंदन केले असून उदगीर परिसरातील नागरिकांच्या रेल्वे संदर्भातील समस्या सुटण्यास मदत होईल. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

About The Author