श्रमिक क्रांती आभियान महाराष्ट्र संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी धनाजी कांबळे ,तर जिल्हाध्यक्ष पदी गजानन गायकवाड

श्रमिक क्रांती आभियान महाराष्ट्र संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी धनाजी कांबळे ,तर जिल्हाध्यक्ष पदी गजानन गायकवाड

देवणी (प्रतिनिधी) : देवणी येथे श्रमिक क्रांती आभियानाच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत हंचनाळ गावचे धनाजी नागोराव कांबळे, (डि.एन.कांबळे) यांची मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तर लातुर जिल्हाध्यक्ष पदी गजानन जनार्धन गायकवाड, जिल्हाउपाध्यक्षपदी धोंडीराम गायकवाड आणि देवणी महिला आघाडी प्रमुखपदी पायल पद्माकर कांबळे देवणी यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थीतीत करण्यात आली. संघटना प्रमुखासह उपस्थीतांनी यांचे आभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल जनसामान्यातुन आनंद व्यक्त करण्यात येत आहे. समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे,या निवड बैठकीस संघटना प्रमुख मारुती गुंडीले नळगीरकर, लक्ष्मण रणदिवे, डि एन.कांबळे ,गजानन गायकवाड, कोंडल कांबळे, गोविंद शिंदे,रमेश गायकवाड, देविदास सुर्यवंशी,रमाकांत सुर्यवंशी,शिवाजी राठोड,ज्ञानोबा बिरादार, दिनेश मोतिरावे,मोहन पवार,गोपिनाथ सुर्यवंशी इत्यादी कार्यकर्ते उपस्थीत होते.

About The Author