गंगापूर येथे अखंड शिवनाम सप्ताह व महादेव मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन

गंगापूर येथे अखंड शिवनाम सप्ताह व महादेव मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील गंगापूर येथील महादेव मंदिर कलशारोहण कार्यक्रमानिमित्त आयोजित अखंड शिवनाम सप्ताह कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी अहमदपूर येथील लिंगेश्वर महिला भजनी मंडळाने गुरुमाऊलीच्या गजरात पावले खेळून सर्वांचे लक्ष वेधले.

गंगापूर येथील श्री लिंबाळा महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी नवीन मंदिर व सभामंडप गावकऱ्यांच्या सहकार्यातून बांधण्यात आले आहे. मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम गुरुवार 11 मे रोजी राजेश्वर शिवाचार्य महाराज मेहकर, शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर, शंभूलिंग शिवाचार्य महाराज उदगीर, सिद्ध दयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरूर आनंतपाळकर, श्री गुरु राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न होणार आहे. दररोज शिवपाठ, रुद्राभिषेक, परमरहस्य पारायण, गात्यावरील भजन, प्रवचन, किर्तन व शिवजागर असा नित्य नियमाचा सात दिवस अखंड शिवनाम सप्ताह कार्यक्रम आयोजित केला आहे. 10 मे रोजी सकाळी दहा वाजता राजशेखर राजेश्वर शिवाचार्य महाराज मेहकर यांच्या सानिध्यात शिवदीक्षा कार्यक्रम आयोजित केला आहे. सप्ताह कार्यक्रमात दररोज अन्नछत्र, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सताळा, करवंदी, कबनसांगवी, देवर्जन, लोणी, क्षेत्रपाळ, तिपराळ, चामरगा, येरोळ, भाकसखेडा, महादेववाडी, या गावातील भक्तगणासह पंचक्रोशीतील सदभक्त भजनी मंडळ यांची उपस्थिती राहत आहे. गायक सावंगी पन्नासे कवठेकर, शिवलिंग हत्ते कवठेकर, हार्मोनियम वादक खंडेराव शेवाळा, मृदंगाचार्य कृष्णा भोसले आळंदी देवाची, गणेश भानुसे व्यासपीठ प्रमुख शिवलिंग पाटील यांची विशेष उपस्थिती आहे.शिवदिक्षा व कलशारोहन कार्यक्रमास संपूर्ण गावच्या लेकमात्या उपस्थित राहणार आहेत, या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गंगापूरच्या समस्त गावकरी मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

About The Author