महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील समाजसेवक नागेश हेंगणे यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन व बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्व प्रथम महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी भाजपा नेते दिलीपराव देशमुख,रामलिंग तत्तापुरे ,गाढवे आप्पा, राजकुमार मजगे ,अभय मिरकले, संदीप चौधरी, विकास महाजन, वैजनाथ चौधरी, गोविंद काडवादे, किशोर कोरे,प्रविण डांगे, रामप्रसाद आय्या, शिवकुमार बेंद्रे, आदींनी अभिवादन केल्यानंतर रक्तदान शिबीर संपन्न झाले यामध्ये रक्तदात्याचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होता तब्बल 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाचे आयोजन नागेश शिवराज हेंगणे यांनी केले होते,
या कार्यक्रमासाठी लक्ष्मण अलगुले शिवसेना शहरप्रमुख, अमोल सज्जनशेट्टी, शाम नाकसाखरे, निलेश करडखेले, व्यंकटेश बोरेवार, योगेश स्वामी, रुषभ पाटील, कपिल नाकसाखरे, शिवा औरादे ,नागेश सूर्यवंशी, चंद्रशेखर हमाणे,शैलेश चौधरी,पुणे, अमित गादगे, गोविंद सोळंके, आदीं सर्व मित्रपरिवारांनी या परिश्रम घेतले…

About The Author

error: Content is protected !!