विद्यावर्धिनी विद्यालयाचे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत 27 विद्यार्थी पात्र.
नेत्रदीपक निकालाची परंपरा कायम
अहमदपूर ( गोविंद काळे ) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पाचवी स्कॉलरशिप (पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती) परीक्षा 2023 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला असून या मध्ये जय शिव बहू शिक्षण मंडळ द्वारा संचलित विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालयाचे इयत्ता पाचवी वर्गातील 27 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाले आहेत. शालेय स्पर्धा परीक्षेतील सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जात आहे. शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेली होती. त्यामध्ये अद्विक पाटील242,समर्थ लोलेवार 242 ,समाधान तोगरे, 232 पृथ्वीराज पाटील 202 ,संकेत होनराव 186, साक्षी सोनकांबळे 180,स्वराज मेकले ,144 कार्तिक सूर्यवंशी 186,अधिराज पाटील,130अभीराम कुलकर्णी 140,वैभव साठे 166,प्रसाद कौटंबे , 168 भक्ती कोल्हेवाड 166 , श्वेता उदगीर 142 ,गौरवी गडदे ,146,सुरज घाडगे 140 मार्क घेऊन तब्बल 27 विद्यार्थी परीक्षेत पात्र झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना उमाकांत श्रीमंगले,जाधव दत्तात्रय यांनी मार्गदर्शन केले.या नेत्रदीपक यशाबद्दल जय शिव बहु शिक्षण मंडळाचे शिक्षण मंडळाचे सचिव प्रा.शिवाजी पाटील, मुख्याध्यापिका सुषमा सिद्धेश्वरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.