शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जेल मध्ये जाण्यास तयार,फक्त आवाज द्या – डॉ नरसिंह भिकाणे
मानखेड येथे मनसेचा भव्य शेतकरी मेळावा
अहमदपूर ( गोविद काळे ) : वीस वर्षाच्या चळवळीत शेतकऱ्यांसाठी शेकडो आंदोलने केलीत प्रसंगी कायदा हातात घेऊन न्याय मिळवून दिलोय तुम्ही फक्त आवाज द्या तुमच्यासाठी जेल मध्ये जाण्यास तयार आहे असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी अहमदपूर तालुक्यातील मानखेड सोनखेड येथे घेतलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात केले.धानोरा पंचायत समिती गणातील मानखेड, सोनखेड, पाटोदा,केंद्रेवाडी, कोपरा,चिखली, व्हटाळा,विळेगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा शेतकरी मेळावा आयोजित केला होता.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद सांगुळे,मानखेड चे उपसरपंच प्रवीण कांबळे,प्रकाश बरुरे,मनसे शहराध्यक्ष उमेश रेड्डी, तालुका सचिव विलास सांगुळे,मनवीसे जिल्हासंघटक डॉ यश भिकाणे,तालुकाउपाध्यक्ष उत्तम पाटील,किनगाव जी.प.सर्कल चे विभागाध्यक्ष गजानन पांगरे,मानखेड सोनखेड चे ग्रामपंचायत सदस्य संतोष नारागुडे,सदस्य बालाजी सांगुळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनवीसे जिल्हासंघटक डॉ यश भिकाणे यांनी केले.पुढे बोलताना डॉ भिकाणे यांनी शेतकऱ्यांनो तुम्ही स्वतःला जगण्याचे पर्यायी मार्ग द्या भलेही कितीही नैसर्गिक आप्पती येवो आत्महत्या करू नका त्यापेक्षा ज्या सावकरामुळे तुम्ही हे पाऊल उचलत अहात त्याचे फक्त नाव सांगा आम्ही त्याला उचलू असे आश्वासन त्यांनी दिले.शेवटी बोलताना ते म्हणाले की आता मी फक्त तुमच्यासाठी चळवळीत काम करणार आहे त्यामुळे तुम्ही मला कधीही आवाज द्या तत्परतेने हजर होईल.यावेळी तालुका सचिव विलास सांगुळे यांनी आभारप्रदर्शन केले तर बाळू केंद्रे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन मदन पलमटे, चंद्रकांत सांगुळे,वसंत सारुळे,ज्ञानेश्वर जगताप,विक्रम भिकाणे, ज्ञानेश्वर कासले,तुकाराम तेलंग,मंगेश नागमे,रामकीसन देवरवाड, मदन करपुडे, अभिजित भोसले,कैलास पुणे,उदय घोटमुकले,प्रमोद नारागुडे,विपुल नारागुडे,विष्णू गिरी यांनी कष्ट घेतले.