महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामभाऊ तिरुके, सदस्य प्रा.मनोहर पटवारी आणि प्रशांत पेन्सलवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, प्रा.सी.एम.भद्रे स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.जे.एम.पटवारी, पर्यवेक्षक प्रा.जे.आर. कांदे, दिनविशेष समितीचे प्रा.डॉ.जी.जी.जेवळीकर, क्रीडासंचालक प्रा.एस.बी.मुंढे, कार्यालय प्रमुख श्रीमती प्रतिभा गायकवाड प्राध्यापक तथा कार्यालयीन तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!