भेटा येथे सोयाबीन उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक

भेटा येथे सोयाबीन उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक

औसा (प्रशांत नेटके) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी औसा यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे औसा तालुक्यात ही मोहीम सुरू झाली असून त्याचाच एक भाग म्हणून भेटा येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सध्या कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढण्याने मोजक्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम गावातील मारुती मंदिरात पार पडला.

. यावेळी कृषी सहाय्यक श्री. कंदले यांनी सोयाबीनची घरगुती पद्धतीने बियाण्याची उगवणक्षमता तपासणी कशी करावी,तसेच माती तपासणी चे फायदे व माती तपासणी करण्याची पद्धत ही यावेळी त्यांनी समजावून सांगितली .याबाबत सविस्तर मार्गदर्शन व ,उगवणक्षमताउगवण क्षमता प्रात्यक्षिक करून दाखविले.तसेच मूलस्थानी जलसंधारण या विषयाबाबत कृषी सहाय्यक श्री एम. जी. वाघमारे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शेतकर्‍यांनी पेरणी अगोदर बळीराम नांगराच्या साह्याने शेतामध्ये उभ्या आडव्या 10 ते 15 फूट अंतरावर सऱ्या पाडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी मुरले जाते.जुलै-ऑगस्टमध्ये ज्यावेळेस पावसाचा ताण पडतो त्यावेळेस या पाण्याचा पिकाला फायदा होतो. पीक लवकर सुकत नाही व उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे प्रयोग अनेक ठिकाणी झालेले आहेत. तोच प्रयोग शेतकऱ्यांनी या गावातही करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. सध्या तालुक्यामध्ये ही मोहीम सुरू झालेली असून त्याचाच एक भाग म्हणून या गावातील शेतकऱ्यांनी या पद्धतीने काम करावे असे आवाहन करण्यात आले.

यावेळी भेटा गावचे सरपंच श्याम शेळके,सोनबा कटारे ,श्रीहरी लोकरे, भारत लोकरे, नागनाथ लोकरे बालाजी मुळे,सोनबा कटारे श्रीहरी भोकरे, भारत लोकरे, नागनाथ लोकरे बालाजी मुळे शेतकरी उपस्थित होते.

About The Author