भगीरथ राजा नगरात सिमेंट रस्ते, नाली नसल्याने पसरली दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात !
उदगीर (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील भगीरथ राजा नगर जळकोट रोड उदगीर लगत असलेल्या भगीरथ राजा नगर ते कमलेश्वर कन्या विद्यालय उदगीर या चिखलमय रस्त्यांचे सिमेंट रोड रस्ता व नाली बांधकामसह रस्त्याची पथदिवे इत्यादी नागरी सुविधा करण्याबाबत मुख्याधिकारी नगरपरिषद उदगीर यांना रहिवाशांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील भगीरथ राजा नगर ते कमलेश्वर कन्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या भागातील रस्ते नसल्यामुळे कच्च्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या भागातील नागरिकांना कुठलीही सुविधा मिळत नाही की, नगरपरिषद लक्ष देत नाही. त्यामुळे हा भाग म्हणजे नागरिक समस्येचे माहेरघरच बनला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरातील प्रभाग चार मधील भगीरथ राजा नगर कमलेश्वर कन्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ते गोविंद निवास ते छत्रपती शिवाजीनगर या भागात गेल्या अनेक वर्षांपासून सिमेंट रोड, नाली बांधकाम व पथदिवे इत्यादी मूलभूत सुविधा व्हाव्यात, यासंदर्भात येथील रहिवाशांच्या वतीने अनेकवेळा मुख्याधिकारी नगरपरिषद व जिल्हाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी, नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे व तोंडी सतत मागणी केली असतानाही अक्षम्य दुर्लक्ष केले गेले. आज उन्हाळ्यातही या रस्त्याने धड चालताही येत नाही, येथील रहिवाशांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांना दिलेल्या निवेदनात या भागातील रस्ते चिखलमय व छोटे मोठे खड्डेमय आहेत. रस्त्याने दिवसा नीट चालता सुद्धा येत नाही. रस्ता नसल्याने वस्तीतील एखादा नागरिक आजारी पडल्यास त्याला चौघांच्या खांद्यावर, बाजेवर किंवा खाटेवर चिखलातून रस्ता पार करीत हॉस्पिटलला घेऊन जावे लागत आहे. या भागात रस्ते व नाली नसल्याने जागोजागी घरांसमोर सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे गल्लीत डेंगू, मलेरिया सारखे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या भागातील नागरिकांना कुठलीही सुविधा मिळत नाही की, नगरपरिषद, नगरसेवक, लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. लहान वयाचे बालक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजाराने ग्रस्त रुग्ण यांची अवस्था अत्यंत बिकट आहे.या भागातील नागरिकांना सुविधे अभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी मुख्याधिकारी नगरपरिषद व आ. संजय बनसोडे यांनी भगीरथ राजा नगर ते कमलेश्वर कन्या विद्यालय, शिवनगर, छत्रपती शिवाजीनगर पर्यंत सिमेंट काँक्रेट रोड व नाली बांधकाम त्वरीत करून दयावे. अन्यथा नगरपरिषद उदगीर कार्यालयावार सनदशीर मार्गाने, दि.१५ जून २०२३ पासून सर्व रहिवासी नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, अबालवृध्द, कामगार निषेध मोर्चा, अमरण उपोषणचेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर बालासाहेब गोविंदराव शिंदे, एम.पी.सकनुरे, एन.पी.गित्ते, सुभाष सोनटक्के, शामसुंदर चोले, दत्ताञेय केंद्रे, एन.टी.चोले, सुर्यकांत केंद्रे, गंगाधर केंद्रे, नागनाथ केंद्रे, गणेश केंद्रे, शंकर केंद्रे, राम गुट्टे, गुणवंत मुंढे, राजकुमार धुमाळे, मनिषा पाटील, एन.एम.मठपती, अमोल मठपती, आकाश बोळेगावे, बालाजी जाधव, नारायण राठोड, देवानंद बेळसिंगे, विठ्ठल बेळसिंगे, राजकुमार आडे, शिवाजी मुंढे, गणेश बेल्लाळे, रवि तिडके, गिरीधर चिंमनदरे, व्यंकटराव पानचावरे, सैनिक बळीराम केंद्रे, सौ.पुजा बेळसिंगे, सौ.वंदना धुमाळे, संग्राम माने, सौ.सुलोचना बाबू लदाडे, अंकुश साळुंके, केंद्रे, तिडके, शिंदे, बेळसिंगे, धुमाळे, सोनटक्के, सुमनबाई राठोड यांच्यासह असंख्य रहिवांश्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.
