जय हिंद च्या विद्यार्थ्याचे जेईई परीक्षेत यश संपादन

जय हिंद च्या विद्यार्थ्याचे जेईई परीक्षेत यश संपादन

उदगीर(प्रतिनिधी) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या वतीने इंजिनिअरिंग प्रवेशा करिता एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई-मेन) परीक्षेत यश संपादन केले आहे, तसेच जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाले आहेत.

या परीक्षेत पिराजी रुस्तुम गुहाडे,गौरव साहेबराव जाधव, सोमनाथ पिंजाजी सोनुने, तानाजी लक्ष्मण भिसे, ऋषिकेश गजानन तरफे, विश्वनाथ सुभाष धुमाळे, यश भास्कर सपकाळ यांनी ऑल इंडिया रँक मध्ये घवघवीत यश संपादन करून एनआयटी इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश निश्चित केला आहे.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप, जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय हट्टे, जय हिंद पब्लिक स्कूलच्या मॅनेजर ज्योती स्वामी, उपप्राचार्य श्रीकांत शिवराम, ज्युनियर कॉलेजचे मॅनेजर अतेंद्र सिग, मनोरमा शास्त्री, सतीश वाघमारे, सविता बिराजदार, सोमनाथ झरकुंठे, सुशांत जाधव यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!