दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1269
नवीन 540 कोरोनाबाधित रुग्ण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 75074 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 540 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 1191 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 222 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. प्रलंबित 300 पैकी 108 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 1510 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 210 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 84493 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 7688 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1731 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 75074 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1269 आहे.