बजरंग दलाच्या वतीने गावच्या प्रवेशद्वारावर नागरीकांची सॅनिटायझर ने फवारणी
अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील रूध्दा या गावी कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर विश्व हिंदू परिषद बजरंग दल तालुका संयोजक गजानन चंदेवाड यांच्या जन्मदिनानिमित्त रुद्धा या गावच्या प्रवेशद्वारावर गावांमध्ये बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमुळे गावात कोरोना संसर्गजन्य रोग पसरु नये व गावच्या सुरक्षिततेसाठी गावात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक नागरीकांचे पेट्रोल फवाऱ्याद्वारे सॅनिटायझर करण्याचे ठरवले होते त्या अनुशंगाने वाढदिवसानिमित्त तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी रुद्धा गावचे सरपंच सौ वंदनाबाई केंद्रे ग्रामसेवक बिराजदार आरोग्य अधिकारी नाईक विश्व हिंदू परिषद राजुर प्रखंड मंत्री मधुकर धडे, शहर मंत्री शुभम ढेले व नरेश यादव गावतील आण्णाराव केंद्रे , प्रभाकर चंदेवाड, परमेश्वर सुरणर, माधव केंद्रे, सुरज केंद्रे, प्रवीण बालाजी, नागरगोजे चव्हाण, विक्रम नागरगोजे आदींची उपस्थिती होती.