राज्य ऊस नियंत्रण मंडळ समितीच्या सदस्यपदी अविनाश जाधव यांची नियुक्ती

राज्य ऊस नियंत्रण मंडळ समितीच्या सदस्यपदी अविनाश जाधव यांची नियुक्ती

अहमदपूर ( गोविंद काळे ) : राज्यातील सर्व साखर कारखानेनिहाय अंतिम ऊसदर ठरविण्यासाठी राज्य शासनाचे मुख्य सचीव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य ऊसनियंत्रण मंडळ समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात सिद्धी शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रिजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश बाळासाहेब जाधव यांची अशासकीय सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.

  डॉ.सी.सी.रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार उसापासून तयार होणाऱ्या कारखान्यातील साखर व उपपदार्थ यापासून मिळणाऱ्या महसुली उत्पन्नाच्या ७०:३० सूत्रावर आधारित राज्यातील सर्व साखर कारखानेनिहाय अंतिम ऊस दर ठरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा २०१३ ला कायदा अस्तित्वात आलेला आहे . त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे , समितीमधील साखर कारखान्याचे पाच व शेतकरी प्रतिनिधी पाच अशा दहा अशासकीय सदस्यांसह अन्य सरकारी प्रतिनिधी असतील.

     या निवडीबद्दल सिध्दी शुगरचे आधारस्तंभ माजीमंत्री बाळासाहेब जाधव, अहमदपूर मतदार संघाचे आमदार व सिद्धी शुगरचे चेअरमन बाबासाहेब पाटील , सिध्दी शुगरचे संचालक सुरजभैय्या पाटील, संचालिका दिपाली जाधव, सिद्धी शुगरचे व्हाईस प्रिसीडेंट पी.जी. होनराव, टेक्नीकल जनरल मॅनेजर बी.के. कावलगुडेकर, जनरल मॅनेजर (केन ) पी.एल. मीटकर, प्रोसेस जनरल मॅनेजर सी.व्ही. कुलकर्णी,चीफ फायनान्स ऑफिसर राजपाल शिंदे, डिस्टलरी जनरल मॅनेजर शिंदे एस.बी., चीफ अकौंटंट एल.आर. पाटील,परचेस ऑफीसर धनराज चव्हाण आदींनी अभिनंदन केले आहे.

About The Author