मोळवनवाडीत योग्य दाबाने विज पुरवठा करा
सम्राट मित्रमंडळाचा अंदोलनाचा इशारा
अहमदपूर ( गोविंद काळे ) :
तालुक्यातील किनगांव पासुन जवळच असलेल्या मोरवाडी येथे गेल्या वर्षभरापासून योग्य दाबाने विज पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.ही समस्या तातडीने सोडवून नागरीकांना योग्य दाबाने विज पुरवठा करावा अन्यथा महावितरणच्या विरोधात तीव्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
येथील तहसिल कार्यालयाला दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,मागच्या वेळेस सूध्दा गावातील डीपी नादुरूस्त झाली तेंव्हा गावकऱ्यांनी वर्गणी करून नवीन डीपी बसविली मात्र गेल्या कांही महिन्यांपासून डीपी खराब झाली असून गावात फक्त चिमणी सारखी लाईट चालत असून यावर फॅन,कूलर,मिक्सर असे कुठल्याच मशीन चालत नाही.जवळपास चारशे आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात सध्या लाॅकडावून मूळे सर्व जन घरी बसून आहेत मात्र घरातील फॅन,कूलर चालत नसल्याने नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पत्राच्या घरात तर उष्णतमूळे अबाल वृद्धांची तारांबळ होत आहे.
तरी ही समस्या तातडीने सोडवून मोळवनवाडी येथे योग्य दाबाने विजपूयवठा करावा अन्यथा महावितरण कार्यालयापुढे तीव्र अंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,गफारखान पठाण,प्रशांत जाभाडे,शरद सोनकांबळे,अजय भालेराव,बालाजी मस्के,शरद कांबळे,मतीन शेख,मोहम्मद पठाण,नूर मोहम्मद, शहारूख पठाण,सचिन बानाटे आदींचे नांवे आहेत.