देऊळवाडीत कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानचे राजस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण
उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील देऊळवाडी येथील कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड:मय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विलास सिंदगीकर, विजयकुमार चवळे, डी. पी. नादरगे, सरपंच शुभम केंद्रे, हभप पुंडलिक महाराज आळंदीकर उपस्थित होते. पंढरपूर येथील भास्कर बंगाळे यांच्या वाटणी कथासंग्रहास, जळगाव येथील शशिकांत हिंगोनेकर यांच्या युध्दरत कवितासंग्रहास, चंद्रपूर येथील अनंता सूर यांच्या समीक्षाग्रंथास, संभाजीनगर येथील डॉ. रामकृष्ण दहिफळे यांच्या समीक्षा ग्रंथाला तर उदगीर येथील प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर याच्या अभंग ज्ञानेश्वर या साहित्यकृतींना रोख रक्कम, सन्मान चिन्ह, मानपत्र व शाल, पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. विलास सिंदगीकर म्हणाले, लेखकांच्या साहित्य कृतीतून वास्तवतेची उत्तम मांडणी झालेली असून भोवतालच्या जगाचे दर्शन घडविणारे हे पुरस्कार्थी आहेत. तर अध्यक्षीय समारोपात विश्वनाथ मुडपे यांनी आपल्या आठवणीला उजाळा देत आदर्शगाव देऊळवाडी ही माझी खरी कर्मभूमी असून या गावक-यांच्या सहकार्यातून मला आदर्श राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. गावची खरी ओळख आहे ती येथील लेखकाच्या लेखणीमुळेच असे मत व्यक्त केले. स्वागत स्मरणगीत शोभा नागरगोजे यानी तर प्रास्ताविक अंबादास केदार यांनी केले .सुत्रसंचलन रसूल पठाण यांनी तर आभार रामदास केदार यांनी मानले. कार्यक्रमासाठी एकनाथ केदार, देविदास केदार, लक्ष्मण बेंबडे, सिद्धार्थ सुर्यवंशी, प्रा. बिभिषण मद्देवाड, अंकुश सिंदगीकर, रामेश्वर केदार, माधव केदार आदींनी पुढाकार घेतला.