ग्रामीण भागातील मुलांनी खेळाबरोबरच शिक्षणाला ही महत्त्व दयावे – राहुल केंद्रे

ग्रामीण भागातील मुलांनी खेळाबरोबरच शिक्षणाला ही महत्त्व दयावे - राहुल केंद्रे

उदगीर(एल.पी.उगीले) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खेळ आणि शिक्षण यांचा समन्वय ठेवावा. शालेय अभ्यासासोबत च मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले. ते कै.राहुल गंगाधर सुरनर यांच्या स्मरणार्थ मौजे गंडीपाटी (वंजारवाडी) ता.उदगीर येथे ठेवण्यात आलेल्या भव्य खुल्या टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. लातूर जि.प चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तोंडार ग्रामपंचायतीचे सरपंच भरत कोचेवाड, ग्रामपंचायतीचे सदस्य मष्णाजी सुरनर, प्रकाश सुरनर, रामदास मुंडे,दिगाबंर सुरनर, भास्कर कुंडगीर,गंगाधर सुरनर,सुनील सुरनर,राजू वाघमारे,नरसिंग सुरनर उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी ३२ संघानी सहभाग नोंदवला आहे.प्रथम पारितोषिक २१,१११ रूपये राजपाल सुरनर यांच्यावतीने,तर द्वितीय पारितोषिक ११,१११रूपये भास्कर सुरनर यांच्यावतीने ठेवण्यात आले आहे. तसेच सामनावीर,मालिकावीर,उत्कृष्ट फलंदाज,उत्कृष्ट गोलंदाज,उत्कृष्ट यष्टीरक्षक यांना ही प्रत्येकी २५५१ रूपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष गोविंद सुरनर,सचिन सुरनर,उपाध्यक्ष प्रशांत सुरनर,प्रसाद सुरनर,सचिव योगेश सुरनर संयोजक रामदास सुरनर,दिलीप पाटील,भास्कर सुरनर,प्रताप सुरनर तसेच गावातील सर्व क्रिकेटप्रेमी परिश्रम करीत आहेत

About The Author