पुण्यातील तळेगाव हादरले, भरदुपारी चौकात गोळीबार करुन कोयत्याने वार करत हत्या

पुण्यातील तळेगाव हादरले, भरदुपारी चौकात गोळीबार करुन कोयत्याने वार करत हत्या

पिंपरी चिंचवड (केशव नवले) : जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला, या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालाय. गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी भर दुपारी गजबजाट असलेल्या परिसरात हल्ला केल्याने सगळ्यांची एकच धावपळ उडाली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर त्याच ठिकाणी काही वेळ थांबून होते.
जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून आवारे यांनी तळेगावात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी दांडगा जनसंपर्क बनवला होता. सहा वर्षांपूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निवडून आणून किशोर आवारे यांनी राजकारणात आपले स्थान बळकट केले होते.

About The Author