‘मुलांचे स्क्रीन टाईम कमी करुन संस्कार मूल्ये रुजवणे’ या विषयावर महादेव खळुरे यांचे आकाशवाणीवर मुलाखत
अहमदपूर ( गोविंद काळे ) : लहान मुलांचे सुट्टीच्या कालावधीतील स्क्रिन टाईम कमी करुन संस्कारक्षम मूल्ये रुजविण्यासाठी पालकांनी करावयाचे सोपे उपाय ! या विषयावर यशवंत विद्यालयातील कला शिक्षक महादेव खळुरे यांचे
आँल इंडिया रेडिओचे नांदेड आकाशवाणी केंद्रावर दि.14 मे रोजी सकाळी 11 वाजता ‘गंमत जंमत’ या कार्यक्रमात मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.
संगणक, मोबाईल, व्हिडिओ गेम यांसारख्या उपकरणांसमवेत घालवलेला वेळ म्हणजेच स्क्रीन टाईम होय.स्क्रीन टाइम’ हा पालकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा ‘स्क्रीन टाइम’ कमी होण्यासाठी जाणीवपूर्वक पालक,शिक्षक व समाजबांधवांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
आज अनेक कुटुंबांतील जवळपास मुलांकडे स्वतःचा मोबाईल किंवा आईचा मोबाईल आहे. मुले तास न् तास मोबाईल पाहातात.मोबाईल फोन मधून निघाणारे हानिकारक रेडिएशन,डोळ्यांची जळजळ होणे,कमी वयात चष्मा लागणे,चिडचिडपणा,डिप्रेशन,
लठ्ठपणा,हायपरटेंशन इत्यादी समस्या लहान मुलात जाणवत आहेत.
तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे.लहान मुले जेव्हा रडतात मोबाईल दिल्याशिवाय शांत बसत नाहीत. जेवण करताना पालक मुलांना मोबाईल दिल्याशिवाय जेवण करीत नाहीत.असे अनेक उदाहरणे पहावयास मिळतात.मुलांना मोबाईल व टी व्ही पासून दुर ठेवण्यासाठी पालकांनी काय करावे या विषयावर महादेव खळुरे यांनी मुलाखत दिली आहे.
मुलाखत यशस्वी होण्यासाठी
कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे,प्रसारण अधिकारी
राहुल अत्राम यांचे सहकार्य लाभले.
वरील उपक्रमाबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर सचिव शिक्षण महर्षी डी. बी. लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक व्ही.व्ही.गंपले,उपमुख्याध्यापक उमाकांत नरडेले,पर्यवेक्षक दिलीप गुळवे,गजानन शिंदे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.