शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – आ.संजय बनसोडे

शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी - आ.संजय बनसोडे

उदगीर(एल.पी.उगीले) : जगाचा पोशिंदा असलेल्या आपल्या शेतकरी राजाला पेरणीच्या वेळी खते, बियाणे, औषधी दर्जेदार स्वरुपाची उपलब्ध करुन द्यावीत. शेतक-यांनी ज्या बियाणाची पेरणी केली आहे त्याची उगवन क्षमतेची अडचण दुर करुन शेतक-यांना व्हाॅटसपच्या माध्यामतुन शासनाच्या योजना सांगाव्यात. अशा सुचना माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी उपस्थित अधिका-यांना दिल्या.ते उदगीर येथे आयोजीत खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, लातूरचे (आत्मा) प्रकल्प संचालक शिवसांब लाडके, तहसीलदार रामेश्वर गोरे, जळकोटचे तहसीलदार सुरेखा स्वामी, उदगीर तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, जळकोट तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, व्यंकटराव पाटील, विठ्ठल चव्हाण, प्रा.श्याम डावळे, श्रीकृष्ण पाटील, नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, वसंत पाटील, व्यापारी भारत करेप्पा, संदिप देशमुख, संग्राम हासुळे पाटील, विनायक जाधव, अशोक कप्ते, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, आपला लातूर जिल्हा सोयाबीन हब म्हणून नावारूपाला येत असुन पहिल्यांदा लातूरला सोयाबीन परिषद घेतली होती. व्यापा-यांनी त्यांच्या विविध समस्या आज माझ्यासमोर मांडल्या असुन त्या समस्या मी राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांच्या समोर मांडणार आहे. खरीप हंगामात ज्यादा दराने खत विक्री किंवा बोगस बियाणे विक्री होवु नये म्हणून भरारी पथकात दुकानदाराचा समावेश करण्याचा आपण प्रयत्न करणार असुन येत्या पेरणीच्या काळात तात्काळ खते व बी – बियाणे उपलब्ध करुन द्यावेत. अशा सुचना देवुन पिकविमा संदर्भात अडचणी सोडवा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ द्यावे, असे सांगितले.यावेळी तालुक्यातील शेतक-यांनी सर्वाधिक पिकाच उत्पन्न घेतले म्हणून उदगीर तालुक्यातील वायगाव येथील शेख बहादुर गुलाबसाब, रावणगाव येथील भिमराव सिद्रामप्पा डोणगापुरे, सौ.जयश्री भिमराव डोणगापुरे यांचा सत्कार आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी संजय नाबदे यांनी केले. सुत्रसंचलन नितीन दुरुगकर यांनी केले.

About The Author