अंतीम विजेता संघ ठरला “श्रीकांत क्रिकेट अकॅडमी संघ”
अजित पाटील कव्हेकर चषक टी-20 : पाटील वारीयर्स ठरला उपविजेतेपदाचा मानकरी
लातूर (प्रतिनिधी) : येथील भाजपा युवा मोच्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून व अराईज अकॅडमीचे संचालक रणजितसिंह पाटील कव्हेकर पुढाकारातून 21 ते 28 डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. 28 डिसेंबर रोजी पाटील वॉरियर्स व श्रीकांत क्रिकेट अकॅडमी यांच्यामध्ये झालेल्या अंतीम सामन्यात श्रीकांत क्रिकेट अकॅडमीचा संघाने 13 ओव्हरमध्ये आठ गडी राखून विजय मिळविला. यामध्ये विनोद आडे या खेळाडूने 53 धावा पूर्ण करून सामनावीर होण्याचा मान मिळविला. या संघाला एक लाखाचा धनादेश व चषक देवून आ.अभिमन्यु पवार, भाजपा नेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर आदी मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी पाटील वारियर्स व श्रीकांत क्रिकेट अकॅडमी यांच्यामध्ये झालेल्या अंतीम सामन्यात माजी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या नेर्तृत्वाखाली टिमने विजय मिळविला. या टीमला 1 लाखाचा धनादेश व चषक देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये उपविजेते पदाचा मान पाटील वारियर्स या टिमला मिळाला असून 50 हजाराचा धनादेश देवून सन्मानित करण्यात आले. तर मॅन ऑफ दी सिरीजचा मान शुभम हरपळे या खेळाडूला मिळालेला आहे. याबरोबरच पर्पल कॅपचा मान प्रशांत कुलकर्णी यांना तर ऑरेंज कॅपचा मान सौरभ शेवाळकर यांना मिळाला असून या दोघांनाही 2 हजाराचे रोख पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. याबरोबरच इमरजिंग बॉल ऑफ टोरणामेंटचा मान बी.सी.सी.संघाचे आशितोष पाटील तर उत्तुंब षटकारचा मान राहुल फेरे यांना मिळालेला आहे. यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियानी, सहसचिव सुरेश जैन, भाजपाचे माजी शहराध्यक्ष शैलेश लाहोटी, दयानंद शिक्षण संस्थेचे सदस्य अजिंक्य सोनवणे, मनपा गटनेते शैलेश गोजमगुंडे, अभिजीत देशमुख, दिपक मठपती, नगरसेवक विशाल जाधव, अराईज अकॅडमीचे संचालक रणजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, प्राचार्य आर.एस.अवस्थी, कुलदिप कवीतके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
योगदान देणार्याचाही अराईजतर्फे सन्मान
21 ते 28 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याबरोबर पंच म्हणून भूमिका पार पडणार्या भरत चव्हाण, राजेश राठोड यांनाही सन्मानित करण्यात आले.यु-ट्युबच्या माध्यमातून लाईव्ह क्रिकेटचे प्रसारण करणार्या दिपक नेवाळकर यांना तसेच खेळाडूच्या आरोग्याची काळजी घेणार्या डॉ.धनंजय पडवळ, बालाजी यादव, सचिन गिरी, आण्णा काळे याबरोबरच समालोचकाची भूमिका पार पाडणार्या हाफिज शेख, शशिकांत पेडगे व संयोजकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडणार्या कुलदिप कवितके यांनाही सन्मानचिन्ह देवून अराईजतर्फे सन्मानित करण्यात आले. यावेळी लातूरसह मराठवाड्यातील खेळाडुंची दयांनद महाविद्यालयाच्या स्टेडीयमवर मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
माजी पालकमंत्री निलंगेकरांचा ऑडिओ संदेश
अजित पाटील कव्हेकर चषक टी-20 राज्यस्तरीय प्रिमीअर लिगच्या पारितोषिक वितरणाला काही कारणास्तव कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आले नाहीत. तरी या कार्यक्रमाबाबत त्यांनी युवा नेते अजित पाटील कव्हेकरांना ऑडीओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. अजितभैय्यांनी राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा घेऊन मराठवाड्यातील खेळाडूंना स्फुर्ती देण्याचे काम केलेले आहे. त्यांच्या या विधायक कृतीस व विजेत्या संघास माझ्या शुभेच्छा आणि अजित भैय्यांची वाटचाल अशीच यशस्वी होत जावो, असा ऑडीओ संदेश दिला. त्यामुळे उपस्थितांचा आनंद द्विगुणीत झाला.