स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेजच्या वतीने फळे वाटप

स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेजच्या वतीने फळे वाटप

उदगीर(एल.पी.उगीले):- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेजच्या वतीने जागतिक परिचारिका दिवसाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्पंदन हॉस्पिटल उदगीर येथे परिचारिका तसेच रुग्णासाठी फळे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी स्पंदन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सुनिल माने, डॉ.मन्मथ देशमाडे, डॉ. नवनाथ सोनाळे, परिचारिका प्रमुख शिल्पा येवले, स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे, नागसेन तारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी प्रिन्सी, स्वाती एन, शिल्पा कवाते, श्रद्धा सोनकांबळे, शकुंतला सोनकांबळे, सुरेश पवळे, बालाजी कदम, प्रवीण पांडे, रविकांत जी यांनी प्रयत्न केले.

About The Author

error: Content is protected !!