जय हिंद पब्लिक स्कूलचा दहावी आणि बारावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम व जेईई मेन्स मध्ये सात विद्यार्थी पात्र

उदगीर(एल.पी.उगीले) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सीबीएसई बोर्डद्वारे 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.या परीक्षेत दहावीतील एकूण 66 विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. यात वैष्णवी पंचावरे-89.02%, आदित्य पाटील 86.06%, अफिफा खान -86.02%, कृष्णा सरोळे-84.08%, तुषार शिरसागर 81.08%, हे विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले आहेत. तर इतर सर्व विद्यार्थीनीनी प्रविण्यासह यश संपादन केले आहे. तसेच बारावीत एकूण 207 विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. यात अनाम गोलंदाज -88.60%, स्मृती कल्याणकर-87.00%, उज्ज्वला महोरे-86.80%, अमित पाटील-85.40%, यश सकपाळ-84.20%, अनुसया कऱ्हाले 83.80%, यश पाटील-82.20%, गायत्री खोकले-81.20%,पिराजी गुहाडे 80.60%, सिंधुताई कऱ्हाले-80.80% प्रतीक तरफे 80.00% हे विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.तर इतर विद्यार्थी प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

जय हिंद पब्लिक स्कूलचा दहावी आणि बारावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम व जेईई मेन्स मध्ये सात विद्यार्थी पात्र


यासोबतच जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सात विद्यार्थीनी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या वतीने इंजिनिअरिंग प्रवेशा करिता एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई-मेन) परीक्षेत यश संपादन केले आहे. तसेच जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाले आहेत.या परीक्षेत पिराजी रुस्तुम गुहाडे,गौरव साहेबराव जाधव, सोमनाथ पिंजाजी सोनुने, तानाजी लक्ष्मण भिसे, ऋषिकेश गजानन तरफे, विश्वनाथ सुभाष धुमाळे, यश भास्कर सपकाळ यांनी ऑल इंडिया रँक मध्ये घवघवीत यश संपादन करून एनआयटी इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश निश्चित केला आहे.
विद्यार्थीनीनी मिळवलेल्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप, जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय हट्टे, जय हिंद पब्लिक स्कूलच्या मॅनेजर ज्योती स्वामी, उपप्राचार्य श्रीकांत शिवराम, ज्युनियर कॉलेजचे मॅनेजर अतेंद्र सिग, मनोरमा शास्त्री, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे,सतीश वाघमारे, सविता बिराजदार, सोमनाथ झरकुंठे, सुशांत जाधव यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

About The Author