उदगीरच्या जनतेचे सहकार्य आणि प्रेम यामुळे चार वर्ष सेवा देता आली – प्रवीण मेंगशेट्टी
चंदर अण्णा वैजापूरे प्रतिष्ठानच्यावतीने ऐतिहासिक निरोप समारंभ
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर शहर हे संवेदनशील म्हटले जात असले तरी या ठिकाणची जनता अधिकाऱ्यांना प्रेम करणारी आणि जिव्हाळा निर्माण करणारी आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या सूचना पाळून कायदा सुव्यवस्थेला मदत करणारी आहे. त्यामुळेच तब्बल चार वर्ष उपविभागीय अधिकारी म्हणून यशस्वी कार्यकाल पूर्ण करता आला. असे भावपूर्ण उद्गार प्रवीण मेंगशेट्टी यांनी काढले. उदगीर येथून त्यांची बदली पुणे येथे झाल्यामुळे उदगीर येथील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या लातूर जिल्ह्यातील अग्रणी संस्था म्हणून ओळखली जात असलेल्या चंदर अण्णा वैजापूरे प्रतिष्ठानच्या वतीने प्रवीण मेंगशेट्टी यांचा निरोप समारंभ भव्य दिव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रकांत अण्णा वैजापुरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गोविंद केंद्रे, तहसीलदार रामेश्वर गोरे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य बस्वराज पाटील कौळखेडकर, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक महासंघाचे संचालक तथा स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले, उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कदम, सौ. लक्ष्मीबाई वैजापूरे, सौ. कल्पना मेंगशेट्टी, सौ. संपदा गोरे, सौ. अमृता वैजापूरे, सौ. भोसले, सौ. कारामुंगे, सौ. हेरकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना प्रवीण मेंगशेट्टी यांनी उदगीरच्या जनतेचे जणू पालकत्व स्वीकारून, कोरोना काळात फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम केले. अत्यंत तळमळीने आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाने त्यांनी केलेल्या कामाची आठवण उदगीरकर कधीच विसरू शकत नाहीत, एक आजातशत्रू प्रशासकीय अधिकारी म्हणून उदगीरची जनता कायम प्रवीण मेंगशेट्टी यांना स्मरणात ठेवेल, असा विश्वास चंदरअण्णा वैजापूरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे संयोजक श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा ऐतिहासिक निरोप समारंभ आयोजित करून उदगीर शहरातील प्रमुख रस्त्यावरून प्रशासकीय अधिकाऱ्याला घोड्यावर बसऊन वाजत गाजत मिरवणूक काढली, याप्रसंगी अनेक छोट्या मुलींनी विविध वेशभूषा परिधान करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. हा ऐतिहासिक क्षण पाहून प्रवीण मेंगशेट्टी भारावून गेले होते. सत्काराला उत्तर देताना ते अत्यंत भावनिक होऊन बोलत होते. याप्रसंगी त्यांना अश्रू अनावर होत होते.
या देखन्या आणि ऐतिहासिक सोहळ्यासाठी शिवराज मलशेट्टे, महादेव अण्णा वैजापूरे, शिवसांब पाटील, अमोल निडवदे, शिवकुमार सोनटक्के, कैलास पाटील, शिवा पाटील, राजकुमार बिराजदार बामणीकर, सरपंच बालाजी पाटील नेत्रगावकर, विश्वनाथ बिरादार, कल्याण बिरादार, तानाजी जाधव, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, व्ही. एस. कुलकर्णी, सुरेश पाटील नेत्रगावकर, रवी हसरगुंडे, महादेव रोडगे शांतवीर मुळे, प्रा. प्रदीप वीरकपाळे, विजयकुमार चवळे, सय्यद जानीभाई, सुरज वैजापूरे, लक्ष्मीकांत स्वामी, प्रा. स्वामी नागलगावकर, प्रा. अख्तर, प्रा. हक्कानी, अजय शेटकर, सचिन वाघमारे, अशोक बाहेती, दिलीप माका, बसवराज मुळे, महेश मळगे, बसवराज बिरादार, वैजनाथ बोंडगे, महेश देशमुख, विजय रायवाडे, शिवशंकर पाटील, संजय जामकर, संतोष चौधरी, अशोक कांबळे, दिलीप कांबळे, मुन्ना सूर्यवंशी, सतीश मुळे अखिल भाई, उपसरपंच नंदकुमार पटणे, केदारनाथ मलशेट्टे, सुनीत देशपांडे, अशोक बिरादार, संतोष सूर्यवंशी, ज्ञानेश्वर मोरे, नितीन मुस्कावाड, श्रावण कापसे, गणेश बिरादार, बाळासाहेब नवाडे, रमेश खंडोमलके, महेश नवाडे, विजयकुमार सुवर्णकार, गिरिधर राजपुरोहित, भास्कर जाधव, शिवशंकर खड्डे, गुरु धनशेट्टे, पप्पू डांगे, विलास भंडे, चेतन परशेन्ने, बालाजी जमालपुरे, किशन कदम यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. सिद्धेश्वर पटणे यांनी तर आभार प्रदर्शन या कार्यक्रमाचे संयोजक तथा चंदरअण्णा वैजापूरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले.